स्थलांतर ! (आणि या ब्लॉग वरची अखेरची पोष्ट )

स्थलांतर !

मी फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘ब्लॉग’ लिहण्यास सुरवात केली , आज त्याला तीन वर्षे झाली. तीन वर्षात ३०० लेख , आणि १,२५,००० वाचन संख्या या लेखनास मिळाली आहे. हा ब्लॉग ‘वर्ड प्रेस’ च्या माध्यमातून आपल्या समोर सादर होत होता. त्यात काहीही अडचण आली नाही पण ‘वर्ड प्रेस’  ची म्हणून काही बंधने आहेत, त्यामुळे माझ्या आगामी योजनां साठी (ज्योतिष क्लास , वेब-साईट / अ‍ॅप डेव्हलपमेंट , ऑन लाईन मार्केटींग ) हे माध्यम उपयोगाचे नाही त्यामुळे स्वत:ची वेबसाईट असावी असे मनापासुन वाटले , गेले वर्षभर हा विचार मनात घोळत होता, आज त्याला मुर्त रुप आले आहे.

ही वेब-साईट मी आणि माझा मुलगा चि. यज्ञेश (यश) दोघांनी मिळून डीझाईन केली आहे. साईट जास्तीतजास्त मराठीत असावी आणि त्यापेक्षाही ती कमालीची आकर्षक , नेत्रसुखद असावी हे आधी पासुनच ठरवले होते. म्हणुन मांडणी, रंगसंगती, व्हाईट स्पेस चा वापर, मिनिमिलॅस्टीक रचना , सुबक – वळणार फॉन्ट्स यावर आम्ही जास्त लक्ष दिले आहे. आपल्याही ते लक्षात येईल. आम्ही सध्या कार्यरत असलेल्या अनेक मराठी वेब-साईट्स पाहील्या आहेत आणि आम्ही अगदी अभिमानाने सांगू शकतो कि आमच्या साईट इतकी सुबक , सुंदर मराठी वेब-साईट सापडणे अवघड आहे (कोणाला तशी ती आढळल्यास आम्हाला जरुर कळवा).

या वेब-साईट ची रचना तीन ट्प्प्यांत होणार आहे.

  1. पहीला टप्पा: ब्लॉग – माझे लेखन (हा टप्पा आता खुला होत आहे)
  2. दुसर्‍या ट्प्पा : यात आमच्या सर्व व्यवसायीक सेवा – ज्योतिष क्लास , वेब-साईट / अ‍ॅप डेव्हलपमेंट , ऑन लाईन मार्केटींग असतील
  3. तिसर्‍या टप्पा:  यात खास ज्योतिष क्लास च्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा असतील.

गुढी पाडव्याला खुल्या होणार्‍या टप्प्यात ब्लॉग वाचावयास मिळेल. याची खास वैषीष्ट्ये:

  • आकर्षक चित्रें
  • वेधक मांडणी
  • सुबक , वळणार फॉन्ट (अक्षरें)
  • कमालीची गतीमानता
  • पी.सी. , टॅब . फोन सर्व माध्यामातून तितक्याच सहजतेने पाहता येईल अशी रिस्पॉनसीव्ह रचना .

या साईट वर अनेक पृष्ठे आहेत:

  1. समग्र: सर्व लेख क्रमवार
  2. केस स्ट्डीज : मी लिहलेल्या अनेक केस स्ट्डीज एकत्रित
  3. अनुभव: माझे ज्योतिष शास्त्राचे , ज्योतिषांचे, जातकांचे अनुभव
  4. माहीती: मी लिहलेले ज्योतिषशास्त्रा वरचे अनेक अभ्यासपूर्ण लेख
  5. ग्रंथ हेच गुरु: ज्योतिष विषयक ग्रथांची परिक्षणें, ग्रंथांच्या याद्या , ग्रंथ कोठे मिळतील अशी परिपूर्ण माहीती.
  6. ज्योतिष मार्गदर्शन : जातकांचे अनुभव, मार्गदर्शन कसे घ्यायचे इ.
  7. अवांतर: ज्योतिष व्यतिरिक्त अन्य इतर विषयांवर केलेल लेखन , विनोद, पाककृत्या

असे बरेच काही.
प्रत्येक पृष्ठ वेगळ्या मांडणीचे आहे , लेखाच्या विषयानुसार मांडणी केली आहे , आपल्याला ती आवडेल.
नवी साईट  आकर्षक आहे, अनेक सुखसुविधांनी परिपूर्ण आहे, अनेक नवीन फिचर्स आहेत, अनेक पटीने जलद आहे , समृद्ध आहे असे असले तरी  या ब्लॉग वर असलेल्या अनेक सुविधा पुर्वत असतील.
संपर्क: प्रत्येक पृष्ठाच्या तळाशी संपर्क फॉर्म आहे , तो भरुन  पाठवल्यास मी आपल्याशी त्वरीत संवाद साधेन. मात्र त्यासाठी आपण आपली माहीती बिनचुक आणि खरी देणे आवश्यक आहे . बर्‍याच वेळा ईमेल अ‍ॅड्रेस चुकीचा लिहला जातो असा माझा अनुभव आहे.

कॉमेंट्स (लेखावर दिलेली प्रतिक्रिया ) ही पूर्वी सारखीच उपलब्ध आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही. प्रत्येक लेखाच्या (पोष्ट) तळाशी ‘कॉमेंट’ देण्याची सोय आहे. लेखाला आधी कोणी दिलेल्या कॉमेंट ला म्हणजेच ‘कॉमेंट वर कॉमेंट ‘ ही सुविधा पण उपलब्ध आहे.वाचकांनी दिलेली कॉमेंट प्रथम माझ्याकडे ईमेल मार्फत पोहोचते , आणि जर ती कॉमेंट मला योग्य वाटली तर मी ती प्रकाशित करतो अन्यथा नाही. कोणती कॉमेंट प्रकाशीत करायची हा सर्वस्वी माझ्या हक्क आहे आणि याबद्दल कोणी आग्रह धरु नये वा वाद-विवाद उपस्थित करु नये ही विनंती.आपल्या कॉमेंटचे मनापासुन  स्वागत आहे पण आपली कॉमेंट लेखाच्या विषयाशी सुसंगत असावी आणि सभ्य भाषेत असावी इतके पहा म्हणजे झाले! कॉमेंट प्रकाशीत झाली की ती सर्वांना पाहता येईल त्यामुळे कॉमेंट मध्ये शक्यतो वैयक्तीक खाजगी माहीती देऊ नये. तसेच कॉमेंट देण्याच्या निमित्ताने स्वत:च्या ब्लॉग , वेब-साईट ची अथवा व्यवसायाची जाहीरात करु नये.
सोशल मिडीया शेअरींग़: आपल्याला माझा लेख आवडला आणि तो इतरांनी वाचावा असे वाटले तर आपण ते आता करु शकता. प्रत्येक पोष्ट च्या शेवटी सोशल नेटवकिंग चे आय-कॉन दिलेले आहेत , त्यावर ‘क्लिक’ करुन आपन त्या पोष्ट ची लिंक इतरांशी शेअर करु शकता. सध्या मी ‘फेसबुक’ , ‘व्टिटर’ ‘गुगल प्लस’ तसेच ईमेल मार्फत माहिती शेअर करण्याची सुविधा दिली आहे, बाकी मिडीयांचा समावेश आगामी काळॅत करत आहे. माहीती शेअर करण्यासाठी आपल्या कडे फेसबुक , व्टिटर , गुगल प्लस , इमेल अकौट असावे लागेल.
अनुक्रमणिका: ब्लॉग वरचे सुमारे २७० लेख वेब-साईट वर आणले आहेत. मी असंख्य विषयांवर लिहले आहे. त्यामुळे एखादा नेमका लेख हुडकून वाचणे सोपे जावे म्हणून या वेब-साईट वर ‘अनुक्रमणीके’ ची सिविधा दिली आहे त्याचा लाभ घ्यावा.’अनुक्रमणिका’ नावाचे नवे पान वेब-साईट वर आहे, इथे वर्ष – महीना निवल्यास त्या महीन्यातल्या सर्व लेखांची नावे (लिंक्स) दिसतील, हव्या त्या लेखाच्या नाव वर क्लिक करुन तो लेख , नव्या टॅब / विंडॉ मध्ये उघडून वाचता येईल.माझ्या सर्व लेखांचे ‘केस स्ट्डीज’ , ‘माहीती’, ‘ग्रंथ परिक्षण’ ‘अनुभव’ , ‘विरंगुळा’ , ‘अवांतर’ असे वर्गीकरण केले आहे , लेख ह्या वर्गीकरणा नुसार सुद्धा निवडता येतील.मी लिहलेले स्रव्च लेख मला आवडणारच पण त्यातही काही लेख आपण आवर्जुन वाचावे असे मला मनापासुन वाटते , त्यासाठी ‘एडीटॅर्स पिक’ म्हणजे ‘निवडक’ असे सदर आहे त्यात अशा खास लक्षवेधी लेखांची यादी दिली आहे , त्यातले लेख आपल्याला निश्चितच आवड्तील.

आपल्या बेवसाईट वर मोठ्या प्रमाणात ‘हाय रेसोल्युशन’ चित्रें आहेत , ती आकर्षक आणि नेत्रसुखद आहेत पण त्यामुळे वेब-साईट आपल्या फोन / टॅब / पी.सी. वर लोड होण्यास काही विलंब लागण्याची शक्यता आहे. खास करुन जेव्हा माझि साईट पहील्यांदाच पाहताना हा विलंब जास्त जाणवण्याची शक्यता आहे पण जेव्हा तुम्ही दुसर्‍यांदा वेब-साईट ला भेट द्याल तेव्हा ‘ब्राऊसर कॅशे’ वापरली गेल्यामुळे हा विलंब झपाट्याने कमी होईल. बेव-साईट लोड होण्यास लागणार वेळ हा आपल्या इंटरनेट च्या स्पीड आणि आपल्या फोन / टॅब / पी.सी. चे हार्डवेअर किती चांगले आहे यावर वर जास्त अवलंबून आहे. आम्ही इथे केलेल्या टेस्टींग मध्ये ( इंटेल आय 3 , 4 Mbps ) साईट लोड होण्याचा कालावधी अवघा तीन सेकंदाचा आहे. आपल्या कडच्या परिस्थिती नुसार हा कालवधी १० सेकंदा इतकाही असू शकेल.

साईट चे संपूर्ण लोडिंग पूर्ण झाले आहे , साईट च्या चाचणीचे शेवटचे काही किरकोळ टप्पे बाकी आहे ते वेळापत्रका प्रमाणे पूर्ण होत आहेत तेव्हा.. काऊंट डाऊन सुरु केला आहेत
असो, गुढी पाडवा आता काही फार लांब नाही , अवघ्या काही दिवसांची तर प्रतिक्षा…
शुभं भवतु
सुहास

7 thoughts on “स्थलांतर ! (आणि या ब्लॉग वरची अखेरची पोष्ट )

  1. नव्या वेब साईटला गुढी पाड़व्या च्या आगाऊ
    मनपुर्वक शुभेछया.

  2. सुहासजी,

    माझ्या कडूनहि ह्या ब्लॉगवर शेवटची comment 🙂

    नवीन website च्या प्रतीक्षेत.

    संतोष सुसवीरकर

टिप्पण्या बंद आहेत.