नविन वेब साईट

सप्रेम नमस्कार,

फेब्रुवारी , २०१४ मध्ये मी ‘ज्योतिष विषयक ‘ लेखन करण्याच्या हेतुने माझा ‘ब्लॉग’ सुरु केला. त्याला आता तीन वर्षे झाली.

या तीन वर्षात मी जे काही वेडेवाकडे लिहीत गेलो त्याला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलात , कौतुकाचे चार शब्द लिहलेत, मौलिक सुचना दिल्यात त्याबद्दल मी आपणां सर्वांचा ऋणी आहे.


आता मी तुमच्या समोर माझी नविन वेब साईट सादर करत आहे!

स्वत:ची हक्काची वेब साईट असावी असे कधीपासुन वाटत होते, वर्ड्प्रेस वर माझा ब्लॉग़ तसा सुखाने नांदत आहे पण काहीही झाले तरी ते भाड्याचे घर त्याला आपल्या स्वत:च्या मालकीच्या घराची सर थोडीच येणार ? वित – दिड वितीचे का असेना आपले हकाचे घर असावे , खरे ना? त्यासाठी माझी गेले वर्षभर तयारी चालू होती, या नव्या घरा साठी सुदैवाने मला जसे हवे होते तसे समर्पक ‘डोमेन नेम , .com वाले  मिळाले , उत्साह दुणावला. मग वेब -साईट्च्या डिझाईन चे काम सुरु केले.

ही नवी बेव साईट ‘मराठी वेब -साईट्स’ मध्ये सगळ्यात देखणी आणि नेत्रसुखद करायची असा चंग बांधुनच काम चालू केले. साईट ची मांडणी, त्यातला व्हाईट स्पेस चा वापर, ग्राफिक्स, लोगो, फॉन्ट्स , लेआऊट एक ना दोन अनेक बाबीं वर मेहेनत घेतली गेली आहे. या कामात माझा मुलगा चि. यश याची मोलाची मदत होत आहे.

ही नविन वेब साईट एकंदर चार टप्प्यांत बांधत आहे:

  1. पहील्या टप्प्यावर माझे ब्लॉग वरचे सर्व लेखन ( मजकूर, चित्रे, वाचकांच्या प्रतिक्रियां इ सर्व) आपल्या समोर येईल.
  2. दुसर्‍या टप्प्यात आमचे ‘मोबाईल अ‍ॅप’ लॉन्च होईल!  त्याचबरोबर ‘इंग्रजी’ भाषेतली वेबसाईट पण लॉन्च होईल.
  3. तिसर्‍या टप्प्यात माझ्या लेखना व्यतिरिक्तच्या आणखी काही सेवा सुविधा ज्यात माझा आगामी ज्योतिष क्लास, न्युज लेटर , किंडल फॉरमॅट मधली पुस्तकें , ज्योतिसः विषयावर चर्चा करण्यासाठीचा डीस्कशन फोरम अशा बाबीं आपल्या समोर सादर होतील.
  4. चौथ्या टप्पा खास माझ्या क्लास च्या विद्यार्थ्यां साठी असेल, तिथे क्लास चे विडिओ पाहणे, शंका समाधान, क्वीजेस, होमवर्क, आर्टीकल्स, अनुभव, विचारा तर खरें, टीप्स-ट्रीक्स-ट्रॅप्स अशी अनेक सदरें असतील.

सध्या पहीला टप्पा खुला करत आहे पण पुढचे दोन्ही टप्पें आगामी काही महीन्यातच खुले करत आहे.


ही पहा काही चित्रे , साईट कशी असेल याची एक झलक दाखवणारी…

 

 

 

आपली ही नविन वेब -साईट येत्या ‘गुढी पाडव्या’ च्या मुहुर्तावर म्हणजेच मंगळवार , २८ मार्चला आपल्या सेवेत दाखल होत आहे … थोडीशीच प्रतिक्षा!

माझ्या ब्लॉग़ ला जसा भरभरुन प्रतिसाद दिलात तसाच या नव्या वेब – साईट ला लाभावा ही नम्र विनंती.

 

आपले,

सुहास गोखले

यज्ञेश (यश) गोखले

(आणि ही वेब साईट डिझाईन करताना ज्यांनी मोलाचा सहभाग दिला असे आमच्या घरातले सर्व मार्जार कुलोत्पन्न म्हणजे : ताई, अक्का, मोहन, हरणीं, भुर्की, रॉटी, मॉन्टी, जाड्या )

 

24 thoughts on “नविन वेब साईट

  1. सुहासजी,

    अभिनंदन,
    माझ्या माहिती प्रमाणे मराठी मध्ये प्रथमच पूर्ण ज्योतिष विषयाला समर्पित अशी वेब साईट असेल.

    ज्योतिष प्रेमी आणि ज्योतिष अभ्यासकांना ह्या वेब साईट चा नक्कीच उपयोग होईल.

    तुमच्या ह्या उपक्रमाला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा

    तुमचे अभ्यासपूर्ण लेख असेच आम्हाला वाचायला मिळोत.

    आपला,
    संतोष सुसवीरकर

    • धन्यवाद श्री. संतोषजी,

      आपण म्हणता ते खरे आहे, पुर्ण ज्योतिष या विषयावरची माझी ही पहीलीच साईट असेल. तशा काही साईट आहेत पण त्यात किळसवाणी जाहीरातबाजीच दिसते. माझी साईट माझ्या ब्लॉग सारखीच सभ्य आणि संयमित असेल.

      ब्लॉग पेक्षा दहापटीने देखणी आणी नेत्रसुखद साईट आहे…. साईट वरचा मजकूर वेगवेगळ्या फॉरम्यॅट मध्ये पाहता येतो. स्लायडर्स (त्यताही फुल पेज स्लयाडर्स) चा वापर होत असलेली कदाचीत ही पहीलिच मराठी वेब साईट असेल ! हाय रेझोल्युशन इमेजेचा मनमुराद वापर आहे काही इमेजेस तर डोळ्याचे पारणे फेडतील अशा आहेत. साईट वरचे काही लेख मासीके / वृत्तपत्रे मध्ये असतात तसे दोन कॉलम मध्ये असतील जे वाचायला सोपे आणी सरावाचे वाटतील. या साईट साठी अतिशय देखणे असे वळणदार , सुबक मराठी फॉन्ट्स वापरले आहेत जे मराठी बेवसाईट वर कदाचीत प्रथमच वापरले गेले असतील! नेहमीचे मंगल किंवा तत्सम स्टेरिओ टाइप फॉन्ट बघूण / वाचून कंटाळला असाल तर आमचे फॉन्ट म्हणजे इंद्रधनुष्यी कारंजे वाटतील!

      आपली साईट मोबाईल फ्रेंडली आहे, कमालीची रिस्पॉनसिव्ह आहे , सध्या अवध्या तीन सेकंदात लोड होत आहे, प्रयत्न चालू आहेत दोन सेकंदात लोड होण्यासाठी. सध्या लोडिंग़ चा स्कोअर ८५ आहे तो किमान ९५ करायचा प्रयत्न चालू आहे.

      पण या साईट ची खरी मजा ती डेस्कटॉप पीसी वर पाहण्यातच आहे.

      गुढी पाडव्याला साईट सेवेत रुजु होत आहे , आपला सर्वांचा आशीर्वाद हवा आहे.

      सुहास

  2. संकेतस्थळाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा!

    सर, त्या रायसाहेबांचं काय झालं हो पुढे?

    • श्री. प्राणेशजी,

      धन्यवाद.

      मी आता माज्य्या ट्रैनिंग प्रोग्रॅस मधून मोकळा होत आहे, पुढच्या आठवड्यात काही अर्धवट असलेले लेख पूर्ण करायचा प्रयत्न करतो.

      सुहास गोखले

  3. सुहासजी,नविन वेबसाइट साठी अभिनंदन.
    आता लेखनास सुरवात कारावी ही विनंती.

    • धन्यवाद श्री. आण्णासाहेब,

      आत्ताशा कोठे कामतून मोकळीक मिळत आहे , लौकरच लेखनास सुरवात होईल

      सुहास गोखले

    • धन्यवाद श्री. हिमांशुजी,

      ही वेबसाईट खरेतर डेस्कटॉप वरच उत्तम दिसेल , मोबाईल तर ती चांगली दिसेल यात शंकाच नाही. पण मोबाईलचा स्क्रिन अगदीच लहान (रुंदी हा प्रकारच नाही) असल्याने डेस्कटॉप चा सिनेमॅटीक इफेक्ट कधीच येणार नाही , पण इमेजेस चांगल्या दिसतात , फॉन्ट ठीक रेंडर होतो हे पाहीले आहे.

      मराठी फॉन्ट ही एक डोकेदुखी आहे हे मान्य करावेच लागेल, मराठी फॉन्ट कोणीच सिरीयसली डेव्हलप केलेले नाहीत जे आहेत ते कोठे ना कोठे कमी पडत आहेत आम्ही त्यातला त्यात जास्त चांगला फॉन्ट निवडला आहे. मला वेळ मिळाला तर मी स्वत:च एक सुबक मराठी फॉन्ट तयार करुन मराठी भाषेला बहाल करेन (मागे एकदा तसा प्रयत्न करुन बघितला होता पण वेळे अभावी जमले नाही)

      आमचे डिझाईन रिसपॉनसीव्ह आहे, विंडोज, अ‍ॅण्ड्राईड आणि आय ओ एस वर उत्तम दिसत आहे , आय पॅड सध्या उपलब्ध नसल्याने ती चाचणी अद्याप होऊ शकली नसली तरी आयपॅडवर कोणतीही समस्या येणार नाही.

      ब्लॉग़ पोष्ट दाखवण्या साठी मी एकूण १४ फॉरमॅट्स तयार केले आहेत , एकूण सहा प्रकराचे स्लायडॅर्स आहेत , सध्या साईट लोडिंग़ फास्ट होण्यासाठी धडपड चालू आहे, नवीन सीडीएन अ‍ॅरेंजमेंट उत्तम काम देत आहे पण आमच्या होस्ट सर्वर साईडच्या (नेमचीप )काही मर्यादा येत आहेत, बघूया कसा काय मार्ग निघतो ते!

      त्यात गेला संपूर्ण महीना मी नाशकात नव्हतोच आणि त्यातच आता मुलाच्या प्रॅक्टीकल / थेअरी एक्साम होत चालू आहेत त्यामुळे आता आम्हाला मे महीन्यातच काय तो वेळ मिळेल. तेव्हा आतात आहे तशी साईड लॉन्च करायची आणि मे महीन्यात दुसर्‍या फेज बरोबर बाकीचे इश्श्यु सोडवायचे असे ठरवले आहे.

      सुहास गोखले

    • धन्यवाद दिप्तीजी,

      वेब साईट संपूर्ण तयार आहे , बस्स एक दोन मिनिटें मंद आचे वर ठेवून उकळी आली की मांडलीच पानं !

      सुहास गोखले

    • धन्यवाद सई जी,

      नवीन साईट गुढी पाडव्याला सकाळी आपल्या सेवेत रुजु होत आहे , अवश्य भेट द्या आणी ती कशी वाटली ते जरुर कळवा.

      सुहास गोखले

टिप्पण्या बंद आहेत.